Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल एक मोठा निर्णय झाला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा पंधराशे रुपये दिले जात असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत.
जुलै ते नोव्हेंबर दरम्यानचे पाच हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले असून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता येत्या काही दिवसात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने येत्या काही दिवसात या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांना मिळणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत या योजनेचा पुढील हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. खरे तर महायुतीने विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती. यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा सवाल आहे.
तथापि, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. हा निर्णय कदाचित पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात होईल अशी शक्यता आहे. म्हणजेच तोपर्यंत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना याप्रमाणेच लाभ मिळणार आहे. अशातच मात्र लाडक्या बहिणीची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सादर झालेल्या अर्जांची फेरफडताळणी केली जाणार असून यामध्ये खाली दिलेल्या सहा गोष्टी ज्या महिलांकडे असतील त्या महिलांना याचा लाभ मिळणार नसून त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या सहा गोष्टी असल्यास लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या 6 गोष्टी असल्यास लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द होणार
1) ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र याला ट्रॅक्टर हे वाहन अपवाद राहणार आहे. म्हणजे एखाद्या कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर राहिले तरी याचा लाभ मिळणार आहे.
2) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. याचा लाभ जर घ्यायचा असेल तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
3) ज्या कुटुंबातील महिला किंवा कुटुंबातील इतर सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
4) ज्या कुटुंबात आजी-माजी आमदार खासदार असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
5) राज्यातील काही महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हालाही लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही.
6) कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कामगार म्हणून सरकारी विभागात काम करणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार नाही.