स्पेशल

Phone call change life : जीवन गरीबीत जगत होती, अचानक 1 फोन आला; आणि आनंदाने झाली वेडी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- इंडोनेशियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिला गेली अनेक वर्षे अत्यंत गरिबीत जीवन जगत होती. दरम्यान, एके दिवशी अचानक तिला बँकेतून फोन येतो. या फोन कॉलवर महिलेला जे सांगितले गेले त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच उलटले.(Phone call change life)

ही महिला अत्यंत गरिबीत जीवन जगत होती :- मीडिया रिपोर्ट्सनुसार, एके दिवशी सिंडी प्रसेत्य नावाच्या महिलेला बँकेतून फोन आला.या कॉलमध्ये काय बोलले ते ऐकून महिला आश्चर्यचकित झाली. बँकेने सांगितले की, त्यांनी ५ वर्षांपूर्वी बँकेत खाते उघडले होते. त्यात त्यांनी आपल्या बचत खात्यात २३ लाख रुपये जमा केले होते.

महिलेने हे खाते तिच्या कार्यालयाच्या वतीने उघडल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. यामुळे महिलेला या खात्याची माहिती नाही. महिलेला या खात्याचा विसरही पडला होता. त्याचबरोबर या खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढतच गेले. सिंडीलाही याची जाणीव नव्हती. बँकेच्या वतीने सिंडीला आठवण करून देण्यात आली की सध्या तिच्या बचत खात्यात 32 लाख रुपये जमा झाले आहेत.

महिलेचे आयुष्य एका रात्रीत बदलले :- बँकेने महिलेला सांगितले की, व्याज वाढल्यामुळे तिची रक्कम 5 वर्षांत 23 लाख रुपयांवरून 32 लाख रुपये झाली आहे. यानंतर सिंडीला तिचे खाते आठवले.मात्र तिच्या खात्यात इतकी मोठी रक्कम पडून आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता.

बँकेने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हे प्रकरण जगासमोर आले. महिलेकडे एटीएम कार्ड नसल्याचेही बँकेने सांगितले. यानंतर बँकेने त्यांना पैसे काढण्यास मदत केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts