स्पेशल

ब्रेकिंग ! लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या 42 उमेदवारांची यादी आली, पहा…

Lok Sabha Election : यंदा लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकतीच मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी भारतीय निवडणुका आयोगाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सध्या दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोडी घडत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना सर्वाधिक वेग आला असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने देशभरातील उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेहमीच धक्कातंत्रांचा अवलंब करत असते. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना देखील भाजपाने असेच केले आहे. अनेक विद्यमान खासदारांची यादीतून नावे वगळली आहेत. दुसरीकडे भाजपा प्रमाणेच महाविकास आघाडी देखील लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.

यासाठी सध्या महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच, एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील 42 लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार फायनल झाले आहेत. जागा वाटपावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमत झाले असून या जागेवर कोणते उमेदवार उभे राहणार हे देखील आता समोर येऊ लागले आहे.

दुसरीकडे सहा जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू आहे. पण लवकरच या जागांवरील तिढा देखील महाविकास आघाडी सोडवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 किंवा 6 मार्च 2024 रोजी महाविकास आघाडीची जागा वाटप संदर्भातील महत्त्वाची बैठक पार पडेल आणि याच बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

तत्पूर्वी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टने त्यांच्या सूत्राच्या हवाल्यानुसार महाविकास आघाडीकडून कोण-कोणते उमेदवार उभे राहू शकतात याची एक यादी पब्लिश केली आहे. दरम्यान आता आपण हीच यादी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

उबाठा शिवसेनेची लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी 

कल्याण – सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे

ठाणे – राजन विचारे

मुंबई दक्षिण – अरविंद सावंत

मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई

मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर

पालघर – भारती कामडी

छ. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे

नाशिक – विजय करंजकर

रायगड – अनंत गीते

रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत

मावळ – संजोग वाघेरे

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर

वाशिम-यवतमाळ- संजय देशमुख

परभणी – संजय जाधव

शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे

धाराशिव – ओमराजे निंबाळकर

जळगाव – हर्षल माने

हिंगोली – नागेश आष्टिकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाचे संभाव्य उमेदवार 

बारामती – सुप्रिया सुळे

शिरूर – अमोल कोल्हे

सातारा – श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटील

माढा – लक्ष्मण हाके, हाके सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते, मात्र राष्ट्रवादीतून लढण्याची शक्यता

रावेर – एकनाथ खडसे

दिंडोरी – चिंतामण गावित

बीड – नरेंद्र काळे

अहमदनगर – निलेश लंके

भिवंडी – बाळ्या मामा

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी 

गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी , डॉ. नामदेव किरसान किंवा डॉ. नितीन कोडवते या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते

नांदेड – आशा शिंदे

लातूर – अजून नाव ठरलं नाही

धुळे – तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेर

नंदुरबार – के.सी.पाडवी

वर्धा – हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख

नागपूर – अभिजित वंजारी,विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल गुडधेंपैकी एका उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे

जालना – उद्याप उमेदवार निश्चित नाही

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts