Maharashtra Banking News : देशातील बँकिंग सेक्टर मधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. रिझर्व्ह बँकेने देशाच्या 5 सहकारी बँकांवर कठोर कारवाई केली आहे. यातील चार बँका या आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष.
तर एक बँक ही मध्यप्रदेश राज्यातील आहे. दरम्यान, या सर्व बँकांवर बँकिंगशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून या बँकांवर रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
RBI ने बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 च्या विविध कलमांतर्गत या संबंधित बँकांना लाखोंचा आर्थिक दंड ठोठावला आहे. त्यामुळे मात्र या संबंधित बँकेतील ग्राहकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत आता आपण आरबीआयने देशातील कोणत्या पाच सहकारी बँकांवर कारवाई केली आहे आणि या कारवाईचा या सदर बँकेच्या ग्राहकांवर कोणता परिणाम होणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बँकांवर झाली कारवाई ?
RBI ने मध्य प्रदेशातील मैहर येथील मां शारदा महिला नागरीक सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बँकेने प्रुडेंशियल इंटरबँक एकूण एक्सपोजर मर्यादा तसेच प्रुडेंशियल इंटरबँक प्रतिपक्ष एक्सपोजर मर्यादांचे उल्लंघन केले असल्याने बँकेवर दंडात्मक कारवाई झाली आहे.
याशिवाय, आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला 2.60 लाख रुपये, वैजापूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 7.50 लाख रुपये, प्रेरणा नागरी सहकारी बँक लिमिटेडला (औरंगाबाद) 2 लाख रुपये
आणि श्री शिवेश्वर को. -ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वसमतला (हिंगोली) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार ?
आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी या सदर बँकांवर ही कारवाई झाली असून याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँकांना जो आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे
त्या दंडाच्या रकमेची वसुली ही केवळ बँकांकडून वसूल केली जाणार आहे. ग्राहकांकडून कोणताचं दंड वसूल होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे सांगितले जात आहे.