Maharashtra Business Loan : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेतमजुर, नवयुवक, महिला, विद्यार्थी इत्यादींसाठी कायमचं नवनवीन योजना सुरू केल्या जातात. अलीकडे तरुणांमध्ये बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे नवयुवक तरुणांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र भांडवलअभावी तरुणांना इच्छा असून देखील व्यवसाय सुरू करता येत नाही. तरुणांची हीच अडचण लक्षात घेऊन आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….
दरम्यान मराठा समाजाच्या हितासाठी स्थापित झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत देखील मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी दहा हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होत आहे.
यामुळे मराठा समाजातील तरुणांना आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येणे शक्य बनत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत अण्णासाहेब पाटील कर्ज योजना राबवली जाते.
हे पण वाचा :- मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..
कस आहे या योजनेचे स्वरूप
या योजनेचा लाभ केवळ मराठा समाजातील तरुणांना मिळणार आहे. या अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना सर्वप्रथम दहा हजाराचे कर्ज मंजूर होते. दहा हजार रुपये कर्जाची परतफेड दहा रुपये प्रति दिवस या पद्धतीने करावी लागते. विशेष म्हणजे हे बिनव्याजी कर्ज असते म्हणून या कर्जासाठी व्याज द्यावे लागत नाही.
10 हजार रुपयाची यशस्वी परतफेड केल्यानंतर पन्नास हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. 50000 रुपयाचे हे बिनव्याजी कर्ज दिवसाला 50 रुपये या पद्धतीने परतफेड करता येते. या कर्जाचे परतफेड झाल्यानंतर लगेच एक लाख रुपयाचे कर्ज मंजूर होते.
हेदेखील बिनव्याजी कर्ज असते आणि शंभर रुपये प्रति दिवस या पद्धतीने याची परतफेड केली जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधी या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कमाल 45 वर्षे वयाचे नागरिक पात्र ठरत होते. मात्र आता साठ वर्षे वयाचे नागरिक देखील या कर्जासाठी पात्र राहणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबईमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! MMRDA मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, वाचा याविषयी सविस्तर
अर्ज कुठं करणार?
या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक व्यक्ती कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. https://www.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर