Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. मात्र राज्यात असेही काही प्रकल्प आहेत ज्यांची कामे केल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. मुंबई गोवा महामार्ग प्रकल्प तसेच कोल्हापूर सांगली महामार्ग प्रकल्प देखील असेच महामार्ग प्रकल्प आहेत.
या महामार्गांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. यातील कोल्हापूर सांगली महामार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर याचे काम 2012 पासून बंद आहे. अर्थातच या प्रकल्पाचे काम तब्बल 12 वर्षांपासून रखडले आहे.
मात्र आता याच्या कामाला गती मिळणार आहे. कारण की या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हायब्रीड एन्युईटी अंतर्गत एक हजार 192 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गावरील टोल वसुलीचा वाद 2015 पासून न्यायालयात आहे.
दुसरीकडे या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी हा महामार्ग धोकादायक बनला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत. या महामार्गांचे अपूर्ण काम यामुळे होणारी प्रवाशांची हेळसांड आणि अपघातांची मालिका या सर्व पार्श्वभूमीवर या महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
या महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान आता या महामार्ग प्रकल्पासाठी 1192 कोटी 84 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामुळे शिरोली (सांगली फाटा) ते चोकाक आणि चोकाक ते अंकली (सांगली) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे. तसेच हा रखडलेला महामार्ग आता पूर्णत्वाला जाणार असल्याने या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पण, या महामार्गावरील चोकाक ते अंकलीपर्यंतच्या कामासाठी संपादित होणार्या जमीनीला चौपट भरपाई द्यावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे. बाधित शेतकरी या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आक्रमक शेतकऱ्यांनी या मार्गासाठी मोजणीला विरोध करून राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकार्यांना परत सुद्धा पाठवले आहे. म्हणून या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
यासंदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. तसेच उदगाव बायपासवरून हा महामार्ग न्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. पण त्याबाबतही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे या महामार्ग प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला असला तरी देखील याचे काम होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र आहे.