Maharashtra Expressway News : भारतात गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या एका दशकाच्या काळात देशात विविध महामार्गांचे कामे पूर्णत्वास गेली आहेत. देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागातील रस्ते, जिल्हा मार्ग, राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एक नवीन कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे.
हा कॉरिडोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विकसित होणार आहे. जेएनपीए उरण पागोटे चिरनेर चौक असा 29 किलोमीटर लांबीचा ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. हा कॉरिडॉर सहा पदरी राहणार आहे.
हा रस्ता एनएच 66, एनएच 48 आणि एनएच 348 ला जोडला जाणार आहे. या रस्त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याच्या कामानंतर मुंबई-बंगळुरू प्रवास फक्त सहा तासांत करता येणे शक्य होणार आहे.
हा महामार्ग गोवा आणि बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सहा पदरी मार्गासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग जवळपास 29 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाच्या कामाचा डीपीआर देखील तयार केला जात आहे. डी पी आर पूर्ण झाल्यानंतर या कामासाठी प्रत्यक्षात टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
टेंडर प्रक्रिया अंतिम झाली की त्यानंतर संबंधित पात्र ठरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला याचे काम दिले जाईल आणि त्याला वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर फक्त आणि फक्त 30 महिन्यांच्या काळात या प्रकल्पाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.
अशा तऱ्हेने हा नवीन रस्ता पुढील तीन वर्षात सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. खरे तर सध्या स्थितीला मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.
पण जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा मुंबईमधील वाहतूक कोंडी पूर्ण होईल आणि मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण होऊ शकतो असे म्हटले जात आहे.