Maharashtra Expressway News : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील एक महत्त्वाचा महामार्ग येत्या काही दिवसात वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा राज्यातील सोलापूर-तुळजापूर हा महत्त्वाचा महामार्ग काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील तसेच देशातील भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे गर्दी करत असतात.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील भाविकांची दररोजच मोठी गर्दी पाहायला मिळते.
मात्र कोजागिरी पौर्णिमेला ही गर्दी अधिक वाढते. सोलापूरहुन तर अनेक भक्तगण पायी चालत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात असतात.
दरम्यान याच गोष्टीचे दखल घेत प्रशासनाने सोलापूर तुळजापूर महामार्ग दिनांक १४/१०/२०२४ रोजीचे रात्रौ ००:०१ वा. पासून ते दिनांक १७/१०/२०२४ रोजीचे रात्रौ २४:०० वा. पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.
या सोलापूर तुळजापूर मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पायी दर्शनाकरीता जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास प्रतिबंध म्हणून या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर तुळजापूर महामार्ग कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारपासून चार दिवस सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार याची नोंद नागरिकांनी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.
यामुळे जर तुम्हीही या काळात या मार्गाने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही या बदलाची दखल घेऊन इतर पर्यायी मार्गाने आपला प्रवास पूर्ण करावा, जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.