Maharashtra Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. रस्त्यांची अनेक मोठ-मोठी कामे गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात रस्ते अन मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी होत आहे. प्रमुख शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आणखी एका शहरात नवीन रिंग रोड विकसित केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये नवीन रिंग रोड तयार होणार आहेत. मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे.
जेवढी लोकसंख्या झपाट्याने वाढते तेवढीच वाहनांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यामुळे राजधानी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या डे बाय डे वाढत आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांची हीच अडचण आता दूर होणार आहे.
कारण की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या रस्ते प्रकल्पामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राधिकरण रिंग रोड च्या माध्यमातून मुंबईला जोडणार आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 58 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
एमएमआरडीएने मंजूर केलेल्या या ५८,००० कोटी रुपयांच्या योजनेतून ९० किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे विकसित केले जाणार आहेत. हे सर्व रोड शहराला बाहेरील बाजूंनी जोडणी देतील आणि उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहेत.
शहराच्या उत्तरेकडील गुजरात सीमेवर, दक्षिणेकडील कोकण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हे वर्तुळाकाळ रस्ते जातील.या ठिकाणाहून दररोज हजारो नागरिक राजधानी दाखल होत असतात. यामुळे या नागरिकांना या रस्त्यांचा मोठा फायदा होणार आहे.
या हजारो कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट अंतर्गत राजधानीमध्ये ७ बाह्य आणि अंतर्गत रिंग रोड तयार केले जाणार आहेत. सध्या हे प्रकल्प निविदा व विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. लवकरच हे सर्व रिंग रोड पूर्ण होतील आणि भविष्यात मुंबईकरांचा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यासारख्या विविध विकास प्राधिकरणे रिंग रोड नेटवर्कची स्थापना करण्यासाठी MMRDA ला सहकार्य करणार आहेत. यामुळे हे रिंग रोड लवकरात लवकर पूर्ण होतील असे म्हटले जात आहे.