Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीचं शिंदे सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात तब्बल दीड लाख रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेअंतर्गत विहीर खोदायी साठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात एक लाख 50 हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय वर्तमान शिंदे सरकारने घेतला आहे.
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेऊन शिंदे सरकारने शेतकऱ्यांना साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो.
शिंदे सरकारच्या या निर्णयाचा मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना शाश्वत चिंतनासाठी विहीर खोदताना मोठ्या प्रमाणात मदत होईल अशी आशा कृषी क्षेत्रातील जाणकारांनी यावेळी व्यक्त केली आहे.
आधी किती अनुदान मिळत होते
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना अन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना अर्थातच अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळत असे.
तसेच जुन्या विहिरीसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान या अंतर्गत दिले जात असे. मात्र आता या दोन्ही योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
आता किती अनुदान मिळणार?
नव्या विहिरीसाठी चार लाख रुपये, जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी एक लाख रुपये, इनवेल बोअरिंग ४० हजार रुपये, विद्युत पंप संच ४० हजार रुपये, वीज जोडणी २० हजार रुपये, सौरपंप ५० हजार रुपये, शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरण दोन लाख, ठिबक संच ९७ हजार रुपये, तुषार संच ४७ हजार रुपये, डिझेल इंजिन ४० हजार रुपये, एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप ५० हजार रुपये, ट्रॅक्टर किंवा बैलचलित अवजारे ५० हजार रुपये, परसबाग तयार करण्यासाठी पाच हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे.
अर्ज कुठे करावा लागणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे. यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड होईल आणि या लाभाचे वितरण होईल अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.