Maharashtra Farmer Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमची नवनवीन योजना राबवल्या जातात. या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कारगर सिद्ध होत आहेत. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या.
यामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा देखील समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांची कर्जमाफी करण्यात आली होती. तसेच या योजनेचा विस्तार करून नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी मात्र गेल्या सरकारला करता आली नाही. या वर्तमान सरकारने मात्र गेल्या सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 50 हजार रुपये पर्यंतचे अनुदान संबंधित पात्र शेतकऱ्यांना देण्याचे काम सुरू आहे.
हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर
मार्च अखेर या योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळणे अपेक्षित होते मात्र अद्याप जिल्ह्यातील लाखो पात्र शेतकरी यापासून वंचित आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत तीन लाख 577 नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाला देण्यात आली होती.
यानुसार पहिल्या यादीत एक लाख 28 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली आहे. दुसऱ्या यादीत 57,310 शेतकऱ्यांची नावे आली आहेत. आतापर्यंत एक लाख 89 हजार शेतकऱ्यांची यादी मध्ये नावे आली आहेत. यापैकी एक लाख 87 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक लाख 71 हजार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात आले आहे.
हे पण वाचा :- IMD Alert : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुढील 72 तास कोसळणार मुसळधार पाऊस, तर काही राज्यात हवामान खात्याने दिला…
या शेतकऱ्यांना 625 कोटी 32 लाख रुपये आतापर्यंत देण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे देण्याचे काम सुरू आहे तसेच आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार प्रामाणिकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. एकंदरीत 15000 शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित असून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी मागणी केली जात आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, संभाजी नगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, बीडसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार !…