Maharashtra Gharkul 2023 : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे घरकुल योजने संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला हक्काचा निवारा मिळावा म्हणून वेगवेगळ्या आवास योजना सुरू केल्या गेल्या आहेत.
केंद्र शासनाने देखील पीएम आवास योजना ही एक महत्त्वाची आवास योजना सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, राज्यात प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या आवास योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यात अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गातील लोकांसाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….
या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आता याच योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2023 24 या आर्थिक वर्षासाठी नीधीची पूर्तता करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून संबंधित जिल्ह्यांना 60 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आता आपण कोणत्या विभागाला किती निधी मिळाला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! पावरग्रीड कॉर्पोरेशन मध्ये ‘या’ पदाची भरती सुरू, आजच करा अर्ज
कोणत्या विभागाला किती निधी?
मुंबई विभागाला 75 लाख रुपयाचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे.
रमाई आवास योजने करिता पुणे विभागाला 21 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
नासिक विभागाला दोन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
लातूर विभागाला 23 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.
अमरावती विभागाला 42 लाख 50 हजाराचा निधी मिळाला आहे.
नागपूर विभागाला बारा कोटी रुपयांचा निधी रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वितरित करण्यात आला आहे.
याबाबत समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चालू आर्थिक वर्षासाठी 60 कोटी रुपयांचा निधी सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एकंदरीत निधी उपलब्ध झाला असल्याने रमाई आवास योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांना आपले हक्काचे घर या योजनेअंतर्गत मिळण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा :- म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी निघणार जाहिरात; कोणत्या भागातील घरांचा राहणार समावेश? किंमत किती, पहा….