Maharashtra Government Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% एवढा झाला आहे. आधी हा भत्ता 50 टक्के एवढा होता.
याबाबतचा निर्णय या चालू ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील याची अंमलबजावणी ही जुलै महिन्यापासूनच होणार आहे. यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे. महागाई भत्ता फरक आणि महागाई भत्ता वाढीचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे.
दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्यांनाही लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत लवकरच राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल असे दिसते.
अशातच गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि राज्यातील विविध महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.
मात्र एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांसाठी अजून दिवाळी बोनस ची घोषणा झालेली नाही. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी बोनस दिला जात असतो यंदा मात्र दिवाळी बोनस ची घोषणा अजून झालेली नाही.
अशातच एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला यंदा एसटी कर्मचाऱ्यांना ₹6,000 रुपयाचा दिवाळी बोनस मिळू शकतो अशी मोठी माहिती दिली आहे. यासाठी एसटी महामंडळाने 60 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी जमा झाला आहे.
त्यामुळे दिवाळीच्या आधीच एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनसची रक्कम जमा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. खरे तर गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त पाच हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देऊ करण्यात आले होते.
मात्र यावर्षी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढलेली महागाई लक्षात घेता सानुग्रह अनुदान रकमेत एक हजार रुपयांची वाढ होणार असे म्हटले जात आहे. नक्कीचं शासनाने हा निर्णय घेतला तर एसटी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.