स्पेशल

ब्रेकिंग ! संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात, आदेश जारी

Maharashtra Government Employee Strike : राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस (Old Pension Scheme) लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

पण यां NPS योजनेमध्ये पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी नसल्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना OPS लागू करा अशी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला मात्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज अर्थातच 14 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे.

दरम्यान आता संपात सामील होणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेशही निर्गमित झाले आहेत. जेवढे दिवस संबंधित कर्मचारी संपात सामील राहतील तेवढ्या दिवसांचे वेतन कापले जाणार असल्याचे आदेश नुकतेच जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांना या संदर्भातील आदेश उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या माध्यमातून जारी झाले आहेत. या आदेशात संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करा, कार्यालयाकडून संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा असं नमूद करण्यात आल आहे.

सोबतच शासकीय कार्यालय संप काळात वेळेवर उघडण्याची आणि बंद करण्याची व्यवस्था देखील करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. काम नाही वेतन नाही यां धोरणाचा अवलंब करत संपामध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातं कपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts