Maharashtra Government New Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी कायमच कौतुकास्पद अशा योजना सुरू केल्या जातात. मात्र अनेकदा पात्र गोरगरीब यापासून वंचित राहतात.
गरिबांसाठी सुरू केलेल्या योजनेचा लाभ गरिबांना मिळत नाही. तसेच राज्यातील नागरिकांचा संपूर्ण तपशील सरकारकडे एकाच प्लॅटफॉर्मवर अजूनही उपलब्ध नसल्याने सरकारला योजना असताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
यामुळे आवश्यक योजना शासनाकडून राबवल्या जात नाही. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार आता हरियाणा राज्य सरकारच्या धरतीवर परिवार पेहचान पत्र (PPP) राज्यातील कुटुंबांना देऊ करणार आहे. या नवीन कुटुंब ओळखपत्राच्या आधारे राज्यातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा
प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती सरकारकडे असायला हवी जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ कुटुंबांना सहज मिळू शकेल या पार्श्वभूमीवर हे नवीन परिवार पेहचान पत्र शिंदे फडणवीस सरकार आगामी काही महिन्यात जारी करणार आहे.
दरम्यान या योजनेची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार असून केवळ राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. यामुळे येत्या काही महिन्यात ही योजना राज्यात सुरू होईल असा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कौटुंबिक ओळखपत्रावर कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्व माहिती राहणार आहे. म्हणजेच राज्यातील नागरिक सरकारकडून कोणतीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही.
हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….
या कौटुंबिक ओळखपत्रामध्ये कुटुंबाच्या सर्व सदस्यांची नावे राहतील, त्यांचे वय, शिक्षण, जात, राशन कार्ड, पॅन कार्ड, घर, संपत्ती, शेती विषयक माहिती, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेशी संबंधित माहिती, उत्पन्नाची माहिती, करदाते की नाही, मोटार-कार आणि उत्पन्नाची संपूर्ण माहिती, सरकारी सुविधांचा लाभ घेत आहेत की नाही इत्यादी सर्व प्रकारची माहिती समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती मीडियारिपोर्ट मधून समोर येत आहे.
आता महत्त्वाचा प्रश्न असा की नागरिकांना यातून काय मिळणार? तर काही जाणकार लोकांनी सांगितले आहे की या कौटुंबिक प्रमाणपत्रामुळे नागरिक सरकारकडून काहीच लपवू शकत नाहीत. तसेच सर्वसामान्यांना या कौटुंबिक प्रमाणपत्रामुळे शासकीय योजनेचा लाभ, अन्य काही सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी कुठेच पायपीट करावी लागणार नाही.
या कौटुंबिक प्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती प्रविष्ट केलेली राहणार असल्याने याचा लाभ शासकीय योजनेसाठी होऊ शकतो, महत्वाच्या सुविधांसाठी होऊ शकतो असे मत व्यक्त केले जात आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार