Maharashtra Hill Station : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या हिवाळ्यात कुठे पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण मुंबई आणि पुण्यानजीकच्या एका प्रसिद्ध हिल स्टेशन ची माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर दरवर्षी हिवाळ्याच्या सीजनमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर गर्दी करत असतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुद्धा रेल्वे स्टेशनवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरम्यान जर तुम्ही येत्या काही दिवसांनी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील माथेरान हे हिल स्टेशन एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे आशिया खंडातील एकमात्र असे हिल स्टेशन आहे जिथे वाहनांना बंदी आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वाधिक फेमस हिल स्टेशन पैकी एक आहे. येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते.
राज्यातील कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. यासोबतच राज्याबाहेरील पर्यटक देखील येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. माथेरान आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी खूपच प्रसिद्ध असून येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.
हे असे एकमात्र हिल स्टेशन आहे जे पुणे आणि मुंबई या दोन्ही मेट्रो शहरांपासून जवळच आहे. हे हिल स्टेशन मुंबई पासून अवघ्या 90 किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्यापासून अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन टाऊन ऑफ एशिया म्हणून नावारूपाला आलेल्या या हिल स्टेशनच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे नेरळ आहे. जे की माथेरान पासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आहे. याच्यापुढे मात्र गाड्यांचा प्रवेश हा पूर्णपणे वर्जित आहे.
पर्यटकांना नेरळ रेल्वे स्टेशनच्या पुढे हिल स्टेशन पर्यंत जाण्यासाठी पायी जाता येऊ शकते. घोड्यांची देखील सुविधा उपलब्ध आहे. मात्र नेरळच्या पुढे माथेरानला जाण्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय हा येथील टॉय ट्रेन आहे.
नेरळ रेल्वे स्थानकावरून तुम्ही टॉय ट्रेन वर बसून सहजतेने माथेरानला जाऊ शकता. टॉय ट्रेनचा प्रवास देखील खूपच मजेशीर असतो. त्यामुळे येथे येणारे बहुतांशी पर्यटक हे टॉय ट्रेनलाच पसंती दाखवतात.
दरम्यान जर तुम्ही ही माथेरानला जाण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही नक्कीच नेरळ येथे उतरून टॉय ट्रेनने प्रवास करायला हवा. माथेरानला तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसोबत जाऊ शकता. मुंबई आणि पुण्यात राहणारे लोक येथे एक-दोन दिवसाची ट्रिप काढू शकतात.