Maharashtra Mahavitaran Employee Payment : राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. आज राज्यातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मोठी घोषणा शिंदे सरकारने केली आहे. याचा राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज शिंदे सरकारने महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या म्हणजे महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ व्हावी अशी मागणी होती. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा देखील केला जात होता. आज अखेर हा पाठपुरावा यशस्वी झाला असून या संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली आहे.
येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याच निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिंदे सरकारने आता कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खऱ्या अर्थाने आज या हजारो कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असे आपण म्हणू शकतो.
महाराष्ट्र राज्यातील ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा आज झाली आहे. आज सह्याद्री अतिथी गृह येथे या संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात 19 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात १९ टक्के एवढी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.