Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या म्हणजेच एका दशकाच्या काळात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला आहे. विशेषतः रस्ते विकासाच्या बाबतीत केंद्राने महाराष्ट्राला नेहमीचं झुकते माप दिले आहे. याशिवाय राज्य शासनाकडूनही विविध रस्ते विकासाची प्रकल्प गेल्या काही वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. दरम्यान असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत्या काही दिवसांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
महाराष्ट्राला आता लवकरच एका महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लवकरच लोकार्पण कधी होणार या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मोठी माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच मुंबई ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला.
या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर या महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा 2023 मध्ये सुरू करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा दुसरा टप्पा सुरू झाला.
यानंतर, या मार्गाचा तिसरा टप्पा म्हणजेच भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा मार्च 2024 मध्ये वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. याचे लोकार्पण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. अर्थातच आत्तापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होऊन त्यावर वाहतूक सुरू आहे.
उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून आता याच शेवटच्या टप्प्या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमणे हा 76 किमीचा टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याची योजना असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले आहे.
इगतपुरी ते आमणे (जिल्हा ठाणे) मार्गावरील वशाळेनजीक सर्वात कठीण पूल आणि आठ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असून या शेवटच्या टप्प्याचे देखील पुढील महिन्यात लोकार्पण केले जाणार आहे. अर्थातच पुढील महिन्यापासून संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. शेवटच्या टप्प्या अंतर्गत विकसित झालेल्या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हा प्रवास अवघ्या आठ मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे.