Maharashtra New Expressway : मुंबई ते दिल्ली दरम्यान तयार होणार भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आणि मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आगामी काळात एकमेकांना जोडले जाणार आहेत. यामुळे मुंबई सोबतच महाराष्ट्राची उपराजधानी अर्थातच नागपूर शहर देखील दिल्ली सोबत थेट जोडले जाणार आहे.
राज्यातील समृद्धी महामार्गाने जे जिल्हे जोडले गेले आहेत त्या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आता जलद गतीने राजधानी दिल्लीत पोहोचता येणार आहे. समृद्धी महामार्ग बाबत बोलायचे झाले तर हा राज्यातीलच 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग. सध्या याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर चा भाग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. विशेष बाबाजी की बाकी राहिलेला ७६ किलोमीटर लांबीचा मार्ग देखील लवकरच सुरू होणार आहे. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला.
पुढे 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. त्यानंतर 2024 मध्ये भरवीर ते एकच पुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. आता येत्या काही महिन्यांनी समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू होणार आहे.
जेव्हा हा संपूर्ण महामार्ग कार्यान्वित होईल तेव्हा नागपूर ते मुंबई हा प्रवास संख्या आठ तासात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प राज्यातील दहा जिल्ह्यांना जोडतो. दुसरीकडे मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या महामार्गाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांनी हा देखील मार्ग पूर्णपणे रेडी होणार आहे.
हा मार्ग 8 लेनचा असून या महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली या दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असेल तर नागरिकांना 24 तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतो.
मात्र जेव्हा मुंबई दिल्ली महामार्ग प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास फक्त आणि फक्त बारा तासात करता येणे शक्य असल्याचा दावा प्रशासनाच्या माध्यमातून होतोय. नक्कीच या महामार्गामुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
हा महामार्ग देशाच्या एकात्मिक विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दिल्ली-मुंबई महामार्गावरच मुंबई – वडोदरा – जेएनपीटी बंदराला जोडणारा मार्ग आहे.
समृद्धी महामर्गावर आमने येथून एका बाजूने वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे व दुसऱ्या बाजूने सध्याच्या नाशिक महामार्गासाठी एकूण सहा किमी लांबीचा जोडरस्ता बांधला जात आहे.
आमने येथे समृद्धी महामार्ग संपल्यावर एक जोड रस्त्यावरुन वसई, विरार, डहाणू, सुरतमार्गे वडोदरा व तेथून हा महामार्ग मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे भविष्यात नागपूर ते दिल्लीदरम्यानचा प्रवासही वेगवान होणार आहे.