Maharashtra News : राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना तीन दिवसाची विशेष रजा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यातील शिक्षकांसहित शाळांना आता लागोपाठ पाच दिवस सुट्ट्या राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन रत्नागिरी येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामुळे या शिक्षक संघाचे अधिवेशनासाठी राज्य शासनाकडून तीन दिवसाची विशेष रजा मंजूर झाली आहे.
म्हणजेच आता तीन दिवसाच्या विशेषणाचा आणि शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या अशा लागोपाठ पाच दिवस महाराष्ट्रातील शाळांना सुट्ट्या राहणार आहेत. 15 फेब्रुवारीपासून म्हणजेच बुधवारपासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत अर्थातच शिवजयंती, रविवार पर्यंत राज्यातील शिक्षकांना रजा राहणार आहेत. बारामती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अधिवेशनाविषयी थोडक्यात
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे यंदाचे अधिवेशन रत्नागिरी येथे 17 फेब्रुवारी रोजी आयोजित झाले आहे. रत्नागिरी येथील चंपक मैदानावरील अधिवेशन राहणार असून या अधिवेशनासाठी राज्यातील लाखों शिक्षक हजेरी लावणार आहेत. याशिवाय अधिवेशनासाठी राजकारणातील दिग्गज लोकांची देखील हजेरी विशेष लक्षणीय राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीमो शरद पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्या समवेतच राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्रिगनाचीं उपस्थिती राहणार आहे. खरं पाहता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील शिक्षकांची सर्वात मोठी संघटना आहे.
या संघटनेचे एकूण दोन लाख सभासद कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्यातील बहुतेक शिक्षक हजर राहणार आहेत. यामुळे राज्य शासनाने या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांच्या सोयीसाठी 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शिक्षकांना विशेष रजा मंजूर केली आहे.
राज्यातील शिक्षकांना मिळणार पाच दिवसाची सुट्टी
या अधिवेशनासाठी तीन दिवसाची विशेष रजा आणि 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र निमित्त सुट्टी आणि रविवारी 19 फेब्रुवारी रोजीचीं सुट्टी अशी सलग पाच दिवस सुट्टी शाळांना राहणार आहे.
अधिवेशनात या मुद्द्यांवर होणार चर्चा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी येथील अधिवेशनात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि मागण्यांवर सविस्तर अशी चर्चा होणार आहे. यामध्ये जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, एम एस सी आय टी मुदतवाढ, शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती या मागण्यांचा समावेश राहणार आहे.
याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचे हे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री शिंदे स्वतः अधिवेशनाला हजर राहणार असल्याने त्यांच्या पुढ्यात उपस्थित केले जाणार असून या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे काय ग्वाही देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
निश्चितच यंदाचे रत्नागिरी अधिवेशन संघाच्या सभासदासहित राज्यातील इतरही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अति महत्त्वाचे असून सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे या अधिवेशनाकडे सध्या लक्ष लागून आहे.