स्पेशल

मोठी बातमी ! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार प्रभावित; जुनी पेन्शन योजनेसह ‘या’ सहा मागण्या आहेत प्रमुख

Maharashtra News : आज पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा बडगा उभारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडत आहेत. यासाठी वेगवेगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वारंवार शासनाला निवेदने दिली आहेत.

मात्र खेदाची बाब म्हणजे शासनाकडून याबाबत गांभीर्याने दखल घेतली गेली नाही आणि म्हणूनच राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज म्हणजेच 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन एकूण सहा मागण्या आहेत.

या मागणीवर शासनाकडून लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर हे कामबंद आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिला जात आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी विद्यापीठातील परीक्षांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी राज्यात ठीक ठिकाणी निदर्शने केली, यानंतर 15 फेब्रुवारीला काळ्या फिती बांधून कामकाज करत शासनाच्या धोरणांचा निषेध केला, यानंतर 16 फेब्रुवारी लाक्षणिक संप घडवून आणण्यात आला.

हे तीन दिवस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीकडे लक्ष घातले नाही. यामुळे आता नाईलाज म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलनावर जावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

या आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणींमध्ये जुनी पेन्शन योजना या मागणीचा समावेश आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना बहाल करणे, सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनरुज्जीवित करणे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणे, लाभाची योजना लागू करणे, विद्यापीठ-महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्याआधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे या प्रलंबित मागणीसाठी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil