Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे.
कारण की वीस वर्षानंतर या स्वयंपाकी व मदतनीस महिलांच्या मानधनात केवळ एक हजार रुपयांची वाढ शासनाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्वयंपाकी व मदतनीस महिलांना शासनाकडून 1500 रुपये इतकं तोकडं मानधन दिले जात होतं. यामध्ये शालेंय पोषण आहार शिजवून मुलांना खाऊ घालणे, भांड्यांची स्वच्छता करणे, शाळेचा परिसर नीटनेटका ठेवणे यांसारखे कामे देखील या महिलांना करावी लागत.
दरम्यान आता या मदतनीस व स्वयंपाकी महिलांना एक हजार रुपयाची शासनाने मानधन वाढ दिली असून आता त्यांना 2500 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. वास्तविक तोकडं मानधन मिळतं तेही वेळेत मिळत नाही. यामुळे वारंवार या महिलांनी आंदोलने केली. या आंदोलनामुळे कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला तब्बल वीस वर्षानंतर जाग आली. जाग उशिरा आली त्यात मानधन वाढ अवघे हजार रुपये करण्यात आली आहे.
परंतु असे असले तरी या महिलांच्या चेहऱ्यावर शासनाने केलेल्या या मानधन वाढीमुळे आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महिलांना राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मानधन दिल जात. आतापर्यंत राज्याचा हिस्सा 900 आणि केंद्राचा हिस्सा 600 या पद्धतीने पंधराशे रुपये या महिलांना दिले जात. आता राज्य हिस्सात एक हजार रुपयाची वाढ झाली असल्याने मानधन पंचवीसशे रुपये झाले आहे.
दरम्यान शिक्षण संचालयाकडून केंद्र शासनाच्या हिश्यात वाढ केली जावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2002 पासून शाळेत पोषण आहार शिजवून देण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हापासूनच स्वयंपाकी आणि मदतनीस यांची नियुक्ती झाली आहे.
जेव्हा या स्वयंपाकी आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून जे मानधन त्यांना दिले जात आहे तेच मानधन आजतगायत कायम होतं. निश्चितच वीस वर्षांपासून पंधराशे रुपये मानधनात या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. अखेर शासनाने यामध्ये एक हजार रुपयाची तोकडी का होईना वाढ केली आहे यामुळेचं हे कर्मचारी मोठे समाधानी असल्याचे चित्र आहे.