Maharashtra News : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता, मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी एक मोठा निर्णय झाला आहे.
जसं की आपण ठाऊकच आहे की, दिवाळीला महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक व्यक्तींना शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. दरम्यान आता गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हा आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय झाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. निश्चितच गुढीपाडवा हा हिंदू सनातन धर्मात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.
यामुळे या दिवशी या आनंदाचा शिधातुन गोरगरिबांचा सण गोड करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच संविधान निर्माता डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीला देखील आनंदाचा शिधा वाटला जाणार असल्याने यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्याच्या या दोन्ही उत्सवात सरकारच्या या आनंदाच्या शिधामुळे निश्चितच आनंद द्विगुणित होणार आहे.
महाराष्ट्रातील एक कोटी 63 लाख रेशनकार्ड धारक कुटुंबांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. या शासन निर्णयामुळे आता अंत्योदय आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. आता आपण या आनंदाच्या शिधामध्ये शंभर रुपयात काय-काय किराणा मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आनंदाचा शिधा गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीलां वाटण्याचा निर्णय झाला आहे.
या निर्णयाच्या माध्यमातून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. विशेष म्हणजे ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.