स्पेशल

पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ हिल स्टेशनला आवर्जून भेट द्या! महाबळेश्वर आणि माथेरानला सुद्धा विसराल

Maharashtra News : आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना भ्रमंती करायला खूप आवडते. भ्रमंती करण्यासाठी लोक कुठे कुठे जातात. राज्याबाहेर आणि देशाबाहेर जाणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि माथेरान सारख्या हिल स्टेशनला येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे.

पण राज्यात असेही काही हिल स्टेशन आहेत जे की माथेरान आणि महाबळेश्वर सारखेच सुंदर आहेत पण या ठिकाणांची पर्यटकांना फारशी माहिती नसते. तोरणमाळ हे असेच एक हिल स्टेशन आहे. महाराष्ट्रातील खानदेश विभागातील नंदुरबार जिल्ह्यात वसलेले हे ठिकाण खूपच मनमोहक असून येथे खानदेशी सहित महाराष्ट्रातील अनेक भागांमधील पर्यटक पर्यटनासाठी येतात.

तुम्ही इथे गेलात आणि येथील नैसर्गिक सौंदर्य पाहिले तर तुमचे मन हरपून जाणार आहे. हे महाराष्ट्रातील थंड हवामानाचे ठिकाण आपल्या मनमोहक सौंदर्यासाठी ओळखले जात असून जर तुमचाही येत्या काही दिवसांनी पिकनिकचा प्लॅन असेल तर तुम्ही हे ठिकाण निवडू शकता.

महत्त्वाचे म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे शांत ठिकाण खिशाला सुद्धा परवडणारे आहे. मुंबई आणि पुण्यावरून येथे जाण्यासाठी पर्यटकांना फारसा खर्च करावा लागत नाही. कमी बजेटमध्ये तुम्ही तोरणमाळची ट्रिप आयोजित करू शकता आणि आपल्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत सुट्ट्यांचा एन्जॉय घेऊ शकतात.

या हिल स्टेशनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे थंड हवामानाचे ठिकाण तर हे आहेच पण या ठिकाणी ट्रेकिंग करणारे आणि कॅम्पिंग करणारे लोक देखील मोठ्या प्रमाणात येतात. या ठिकाणी असणारे सीताखाई ट्रेल हे ट्रेकिंगसाठी भन्नाट ठिकाण आहे.

या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची गुहा देखील आहे. एवढेच नाही तर येथे गोरखनाथ मंदिर सुद्धा आहे. यामुळे नाथ भक्त देखील तोरणमाळला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. महाराष्ट्रात नाथ भक्तांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

राज्यातच नाही तर राज्याबाहेर देखील नाथ भक्त आहेत आणि हे नाथभक्त तोरणमाळला मच्छिंद्रनाथांच्या गुहेला आणि गोरखनाथांच्या मंदिराला भेट देण्यासाठी आवर्जून येतात. या हिल स्टेशनवर असणारे तलाव देखील पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे.

या हिल स्टेशनवर असणारा यशवंत तलाव आणि लोटस तलाव पाहण्यासारखा स्पॉट आहे. हे हिल स्टेशन मोठमोठ्या, उंच उंच झाडांनी आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे. या ठिकाणी जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर नंदुरबार पर्यंत रेल्वेने जाऊन पुढे बस किंवा टॅक्सीने प्रवास करू शकता.

जर तुम्ही मुंबईहून येथे जात असाल तर नंदुरबार पर्यंत रेल्वेनेचा आणि पुढे टॅक्सीने प्रवास करा. या ठिकाणी थेट बसनेही प्रवास करता येतो राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधून तोरणमाळ साठी बस सुरू करण्यात आल्या आहेत.

बसने किंवा ट्रेन ने प्रवास केला तर तुम्हाला 600 ते 1000 रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. ट्रेनचा प्रवास हा थोडासा परवडतो. दुसरीकडे जर तुम्ही कारने प्रवास केला तर तुम्हाला एकतर्फी म्हणजे एका बाजूने प्रवास करण्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंतचे डिझेल किंवा पेट्रोल साठी खर्च करावे लागू शकतात.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts