Maharashtra News : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या शेतकऱ्याच्या कन्येने क्रीडा क्षेत्रात नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. किरपे या छोट्याशा गावातील प्राची अंकुश देवकर ही शेतकऱ्याची लेक मध्यप्रदेश मध्ये सुरू होणारा खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकीची सर्वत्र चर्चा आहे.
खेलो इंडिया स्पर्धा ही 31 जानेवारीपासून सुरू होणार असून या स्पर्धेसाठी किरपे येथील प्राचीची निवड झाली असल्याने तिच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच गुवाहटी या ठिकाणी झालेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे तिच्याकडून खेलो इंडिया स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवण्याची आशा अख्या महाराष्ट्राला आहे.
विशेष म्हणजे या शेतकरी लेकीने आतापर्यंत सत्तरहून अधिक ट्रॉफी पटकावल्या आहेत. दरम्यान आता तिचं खेलो इंडिया मध्ये सिलेक्शन झालं असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षा होत असून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे.
गुवाहाटीला मिळवलं सुवर्णपदक आता खेलो इंडियाही चमकणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 8 जानेवारी रोजी गुवाहाटीत झालेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेत चार किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने स्वर्ण पदक पटकावले आहे. त्यामुळे तिच्यावर त्यावेळी देखील मोठ्या कौतुकांचा वर्षाव झाला होता. तीला गुहाटीला पाठवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी पैशांची जेमतेम जमवा जमा केली होती.
तिच्या आई-वडिलांना तिच्यासोबत विमानाने जाता येईना पर्वणार नसल्याने ती एकटीच विमानाने स्पर्धेसाठी केली आणि सुवर्णपदक आणून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाच चीज केलं.
प्राची अगदी लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात निपुण आहे. सध्या ती कराड येथील सौ वेणूताई चव्हाण महाविद्यालयात बीए च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.ती सध्या खेलो इंडिया साठी अतोनात अशी मेहनत घेत आहे. सकाळी पाच वाजता कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर तिसरावासाठी जात आहे.निश्चितच या शेतकरीच्या लेकीने आपल्या कामगिरीने खेलो इंडिया स्पर्धेत आपलं स्थान पक्क करून शेतकऱ्याच्या मुली खेळात पण अव्वल आहेत हे दाखवून दिलं आहे.
दरम्यान खेलो इंडिया स्पर्धेत तिच्याकडून सुवर्णपदकाची आशा असून ती नक्कीच यावर खरी उतरेल.निश्चितच सातारा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी असून गुवाहटी नंतर आता मध्यप्रदेश येथे 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकवेल असा विश्वास सातारकरांना आहे.