स्पेशल

शिंदे-फडणवीस सरकारमें है दम! हे सरकार जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग, वेळेवर वेतनही देईल; आता थेट ‘या’ व्यक्तीने दिले आश्वासन

Maharashtra News : गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून उपोषणे, आंदोलने तर काही कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार देखील उपसले जात आहे. गेल्या वर्षी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी देखील शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणी खाली इतर काही पूरक मागण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा संप पुकारला होता.

विशेष बाब म्हणजे एसटी महामंडळाला हा संप मोडीत काढण्यास अपयश आलं होतं. कर्मचाऱ्यांनी मोठा लढा त्यावेळी उभारला होता. याच्या पाठीमागे मात्र वर्तमानात सत्तेत असलेल्या आणि भूतकाळात विपक्ष मध्ये असलेल्या नेत्यांचा खुला पाठिंबा होता. संप काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला भाजपामधील गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन उभारत पार जेरीस आणले होते.

तो संप तब्बल सहा महिने कालावधीपर्यंत चालला. त्यावेळी हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ झाली पण शासनात विलीनीकरण शक्य झाले नाही. मात्र पगार वाढ झाली आणि राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी न्यायालयात आश्वासन दिलं. विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना तदनंतर वेळेवर वेतन दिलं जात होतं.

मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एकदाही या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळालेले नाही. अशा परिस्थितीत वकील गुणरत्न सदावर्ते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या तिघांना आता एसटी कर्मचाऱ्यांकडून तसेच सामान्य नागरिकांकडून जाब विचारला जात आहे. दरम्यान याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतेचं आपले म्हणणे मांडले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या मते, एसटी कर्मचाऱ्यांना नवोदित शिंदे फडणवीस सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.

एसटी कर्मचाऱ्यांना बाबत हे सरकार सकारात्मक आणि योग्य निर्णय घेईल. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात विचारणा केली असता फायनन्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी मनोज सोनिक व महामंडळांमधील गायकवाड नावाचे अधिकारी या दोघांची चौकशी लावणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. एवढेच नाही तर एसटी महामंडळातील काही अधिकारी शरद पवार यांच्या धावणीला बांधलेले असल्याने या अधिकाऱ्यांच्या पिळवणुकीतून सदर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.

येणाऱ्या काळात आपण हे सिद्ध करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर सदावर्ते यांनी शिंदे फडणवीस सरकारवर विश्वास टाकत हे सरकार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतनही देईल, जुनी पेन्शन योजना ही लागू करेल आणि सातवा वेतन आयोग ही लागू करेल अशी शाश्वती असल्याचे यावेळी नमूद केले आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts