Maharashtra Picnic Spot : येत्या काही दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी अनेक जण गोव्याला भेट द्यायला जाणार आहेत. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.
यंदाही गोव्यामध्ये अशीच वर्दळ पाहायला मिळणार असून जर तुमचाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.
खरे तर आज आपण गोव्यापेक्षा सुंदर महाराष्ट्रातील एका समुद्रकिनाऱ्याची माहिती पाहणार आहोत. यामुळे जर तुम्हाला नववर्षाच्या स्वागतासाठी पिकनिकला जायचे असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय बेस्ट ठरणार आहे. खरे तर महाराष्ट्राला अनेक समुद्रकिनाऱ्यांची भेट लाभली आहे.
कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा हा महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणातील गुहागर येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राबाहेरील आणि जगभरातील अनेक निसर्गप्रेमी पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्याला लाभलेला हा समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या वैभवात भर घालतो. वाशिष्ठी नदी आणि जयगडच्या खाडीजवळ गुहागर आहे. अथांग सुंदर निसर्गरम्य समुद्र किनारा आणि पांढरीशुभ्र पुळण हे या जागेचे एक प्रमुख आकर्षण आहे.
यामुळे न्यू इयर सेलिब्रेशन साठी हे डेस्टिनेशन परफेक्ट ठरणार आहे. गुहागर शहराला लाभलेल्या समुद्रकिनारा तब्बल सात किलोमीटर लांब आहे. त्यामुळे जर तुम्हाला न्यू इयर च्या स्वागतासाठी तुमच्या मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत ट्रिप काढायची असेल तर या ठिकाणी तुम्ही आवर्जून जायला हवे.
गुहागर, पालशेत, अडूर – बुधल, बोऱ्याबंदर, हेदवी, वेळणेश्वर, रोहिले, तवसाळ हे गुहागरमधील लोकप्रिय समुद्र किनारे आहेत. पण, यापैकी बहुतांश समुद्र किनारे हे पर्यटकांपासून अलिप्त आहेत. म्हणजेच या समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना फारशी माहिती नाहीये. परिणामी या ठिकाणी पर्यटकांची फारशी गर्दी नसते.
म्हणून जर तुम्हाला शांत आणि निवांत वातावरणात तुमच्या परिवारासमवेत एन्जॉय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट राहील. इथल्या शांत, निवांत समुद्र किनाऱ्यावर फिरताना लाटांचा आवाज कानात घुमतो. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन अक्षरशः हरखून जाते.
या ठिकाणी असणारे अद्भुत नैसर्गिक सौंदर्य तुमच्या ट्रिपचा आनंद द्विगुणीत करणार आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरताना पांढरी शुभ्र वाळू पायांना गुदगुल्या करते अन हिच फिलिंग तुम्हाला अपरिमित आनंद देऊन जाणार आहे.
मुंबईहून गुहागर हे ठिकाण फक्त 298 किलोमीटर अंतरावर बसले आहे तर पुण्याहून हे ठिकाण फक्त 267 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजेच मुंबई आणि पुण्यातील नागरिकांसाठी हे डेस्टिनेशन फायद्याचे राहणार आहे.