Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासी विशेषता मुंबई आणि कोकणातील रेल्वे प्रवासी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे नुकतेच ट्रायल रन कम्प्लिट झाले आहे.
म्हणून आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत केव्हा दाखल होणार? या गाडीला हिरवा बावटा केव्हा दाखवला जाणार? असा प्रश्न मुंबईकरांना आणि कोकणवासियांना पडला आहे.
वास्तविक ही गाडी 29 मे अर्थातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केली जाणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. मात्र हा मुहूर्त आता हुकला आहे. पण अशातचा या गाडीला हिरवा बावटा दाखवण्यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
नवा कोरा रेक मडगावला झाला रवाना
एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा मार्गांसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा नवा कोरा रेक चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना करण्यात आला आहे.
यामुळे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पुढल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये मडगाव रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचे चित्र तयार होत आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा बावटा दाखवतील आणि या कार्यक्रमादरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील हजर राहणार आहेत.
हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिलेत 1500% रिटर्न्स, 1 लाखाचे बनलेत 17 लाख; कोणता आहे हा शेअर, वाचा….
मुंबई गोवा प्रवास होणार सुसाट
या देशातील पहिल्या हाय स्पीड ट्रेनमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या या मार्गावर वेगवेगळ्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत. तेजस एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या मार्गावर सध्या स्थितीला कार्यान्वित आहेत.
यामध्ये तेजस एक्सप्रेसने मुंबई ते गोवाचा प्रवास आठ तास 50 मिनिटात म्हणजे जवळपास नऊ तासात पूर्ण होतो. कोकण कन्या एक्सप्रेसने हा प्रवास दहा तास आणि 41 मिनिटात पूर्ण होतो. जनशताब्दी एक्सप्रेसने हा प्रवास नऊ तासात पूर्ण होत आहे.
तसेच मांडवी एक्सप्रेसने 12 तासात हा प्रवास पूर्ण होत आहे. एकंदरीत या मार्गावर सुरु असलेल्या वेगवेगळ्या एक्सप्रेस गाड्यांना मुंबई ते गोवा हा प्रवास करण्यासाठी नऊ तास ते बारा तासांपर्यंतचा वेळ खर्च करावा लागतो. मात्र हाच प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केवळ सात तासात पूर्ण होणार आहे.
या मार्गावर झालेल्या ट्रायल रन मध्ये सीएसएमटी ते मडगाव हा प्रवास सात तासात वंदे भारत ट्रेनने करून दाखवला आहे. यामुळे साहजिकच प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असून या मार्गावरील प्रवास अधिक जलद आणि सुसाट होणार आहे.