Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. दीपोत्सवाला अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान आगामी दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते नागपूर दरम्यान विशेष गाडी सुरू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे अन्य दीपोत्सवाच्या काळात राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
आता आपण पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून पुणे ते नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नागपूर पुणे दिवाळी विशेष गाडी 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळात चालवली जाणार होती. मात्र आता या गाडीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आता ही गाडी 21 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत चालवली जाणार आहे. अर्थातच या गाडीच्या सात फेऱ्या होणार आहेत. आधी या गाडीच्या फक्त चार फेऱ्या होणार होत्या.
म्हणजेच या नागपूर पुणे दिवाळी विशेष गाडीच्या तीन फेऱ्या वाढवण्यात आले आहेत. दुसरीकडे पुणे नागपूर दिवाळी विशेष गाडी 29 ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार होती. मात्र आता या गाडीचाही कालावधी वाढवण्यात आला आहे.
ही गाडी 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत चालवले जाणार असून या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या सात फेऱ्या होणार आहेत. अर्थातच नागपूर पुणे अशा सात आणि पुणे नागपूर अशा सात फेऱ्या या विशेष ट्रेनच्या होणार आहेत.