Maharashtra Railway News : देशभरातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी अमृतभारत स्टेशनं योजना राबवली जाणार आहे. दरम्यान आता या योजनेबाबत महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील एकूण 15 रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा देखील समावेश राहणार आहे.
विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी जून महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे. जून महिन्यात जर निविदा प्रक्रिया पार पडली तर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या रेल्वे स्टेशनच्या विकास कामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजनेबाबत अधिक माहिती अशी की, या योजनेच्या माध्यमातून देशभरातील प्रमुख रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. या अनुषंगाने आपल्या राज्यातील 123 रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत टेक्नो इकॉनॉमिक्स फिजिबिलिटी स्टडी च्या माध्यमातून 18 स्टेशन विकसित होणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे.
13539 कोटी रुपयांचा निधी या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील अग्रगण्य रेल्वे स्टेशनचा विकास याच्या माध्यमातून साध्य केला जाणार आहे. नागपूर जंक्शन, अंजनी,औरंगाबाद, जालना, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सात स्थानकाचा सुरुवातीला विकास होणार आहे.
यासाठी 4962 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. अशातच आता अजून काही स्टेशनची यादी समोर आली आहे ज्याचा या योजनेच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील 13 स्टेशनचा समावेश आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा या योजनेच्या माध्यमातून 380 कोटी रुपये खर्च करून विकास केला जाणार आहे.
यासाठी निविदा देखील जाहीर झाली असून जून महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर मग जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील जालना, नांदेड, भोकर, गंगाखेड, हिंगोली, किनवट, लातूर, मुदखेड, नगरसोल, परभणी, परळी वैजनाथ, परतूर, पूर्णा, रोटेगाव या रेल्वे स्टेशनचा विकास करणे प्रस्तावित आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विकासासाठी 1813 कोटी रुपये, मुंबई सेंट्रल 850 कोटी रुपये, ठाणे स्टेशन 800 कोटी रुपये, जालना स्टेशन 170 कोटी रुपये, औरंगाबाद स्टेशन 380 कोटी रुपये, अंजनी स्टेशन 360 कोटी रुपये, नागपूर जंक्शन 589 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. निश्चितच अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून राज्यातील अग्रगण्य रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याची योजना शासनाने आखली आहे. यामुळे राज्यातील प्रमुख रेल्वे स्टेशनचा मुखडा बदलणार आहे.
अरे वा ! वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच आता वंदे मेट्रो देखील सुरु होणार ; रेल्वेमंत्र्यांची घोषणा