Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर, आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशीला विठुरायाच्या नजरेत भाविकांची मोठी गर्दी होत असते.
कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जनता विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करत असतात. यंदाही कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गर्दी करणार आहेत.
दरम्यान, याच भाविकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने पंढरपूरसाठी विशेष गाडीची घोषणा केली आहे.
मिरज ते लातूर व्हाया पंढरपूर अशी ही रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. रेल्वे प्रशासन कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने होणाऱ्या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर मिरज-लातूर-मिरज दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे.
या विशेष गाडीच्या एकूण १४ फेऱ्या धावणार असल्याने भाविकांची सुद्धा मोठी सोय होणार आहे. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही माहिती पाहणार आहोत.
कस राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक?
ही विशेष गाडी मिरज येथून सकाळी सात वाजता रवाना होणार आहे आणि पंढरपूरला सकाळी सव्वादहा वाजता पोहोचेल आणि लातूरला दुपारी साडेतीन वाजता पोहोचणार आहे.
तसेच, लातूर स्थानकावरून दुपारी चार वाजता सोडली जाणार आहे, पंढरपूर स्थानकावर सायंकाळी पावणेआठ वाजता आणि पुढे मिरज स्थानकावर रात्री पावणे बारा वाजता पोहोचणार आहे.
कुठे थांबा घेणार?
ही विशेष गाडी आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जिंती रोड, म्हसोबा, डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, शेंद्री,
बार्शी टाउन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरुड, औसा, हरंगुळ या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.