Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ही बातमी पनवेल मधील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कारण की, दिवाळी सणाच्या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून पनवेल वरून विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पनवेल रेल्वे स्थानकावरून सोडली जाणारी ही विशेष रेल्वे गाडी मराठवाड्यातील नांदेड पर्यंत चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण पनवेल ते नांदेड दरम्यान धावणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच ही गाडी या मार्गावरील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार पनवेल नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-हजूर साहीब नांदेड विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०७६३६) ७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता नांदेडला पोहचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी नांदेड येथून ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला पोहचणार आहे.
या विशेष ट्रेनला या मार्गावरील लोणावळा पुणे सहित अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा फायदा होणार आहे.
ही गाडी या मार्गावरील तब्बल 12 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार?
नांदेड ते पनवेल दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला कर्जत, लोणावळा, पुणे, दौड, कुर्दुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड,
परभणी आणि पूर्णा इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. दिवाळीच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या गाडीचा फायदा होईल असे म्हटले जात आहे.