Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरंतर, भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवली जाते.
याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा खूपच सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा आहे. अलीकडे मात्र रेल्वे प्रशासनाच्या काही निर्णयामुळे रेल्वेचा प्रवास सुद्धा सर्वसामान्यांसाठी मोठा खर्चिक ठरू लागला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने काही पॅसेंजर गाड्यांना मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा दर्जा दिला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की या पॅसेंजर गाड्यांमधून मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा दर्जा दिला असल्याने प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचे भाडे द्यावे लागत आहे.
यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास देखील आता मोठा खर्चिक वाटू लागला आहे. अशातच मात्र महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
काही एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. राज्यातून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना पॅसेंजर गाडीचे तिकीट काढावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने, भुसावळ-नागपूर आणि अजनी-अमरावती-अजनी या दोन गाड्यांच्या तिकिटासंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर या दोन्ही गाड्या इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेमु’ ट्रेन आहेत. पण या गाडीमधून प्रवास करण्यासाठी एक्सप्रेस गाड्याचे दर आकारले जात होते.
त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र, आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारले जाणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.