Maharashtra Railway News : लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील पर्यटक गर्दी करत असतात. लोणावळ्याला रेल्वे मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, मुंबईहून लोणावळ्याला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
अशातच, पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे मुंबई आणि पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर मुंबई आणि पुण्यातून लोणावळ्याला जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.
अशा परिस्थितीत, रेल्वेचा हा निर्णय मुंबई आणि पुण्यातील नागरिकांसाठी मोठा फायद्याचा ठरणार असून या निर्णयामुळे नक्कीच मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना दिलासा मिळणार आहे.
गदग एक्सप्रेस ही मुंबई येथीलच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थातच सीएसएमटी ते गदग मधील गदग रेल्वे जंक्शन पर्यंत धावते.
ही गाडी दादर सेंट्रल, ठाणे रेल्वे स्टेशन, कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर, विजयपुरा (विजापूर), बागलकोट जंक्शन, बदामी या रेल्वे स्थानकावर थांबा घेते. पण, आता ही गाडी लोणावळा रेल्वे स्थानकावर देखील थांबा घेणार आहे.
याशिवाय, दादर सेंट्रल ते चेन्नई सेंट्रलपर्यंत धावणारी चेन्नई एक्सप्रेस देखील आता लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
ही गाडी कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन, सोलापूर, वाडी, रायचूर, गुंटकल जंक्शन, रेनिगुंटा जंक्शन आणि अरक्कोनम जंक्शनवर थांबा घेत असे. मात्र आता ही गाडी लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.