Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने राज्यातील तब्बल 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज यावेळी जाहीर केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान असून पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची वाढ नमूद करण्यात आली असून यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेली आहे.
महाराष्ट्रात आज पावसासाठी पोषक परिस्थिती आहे, राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) सुद्धा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आला असून या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.
हवामान खात्याने केलेल्या माहितीनुसार आज खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती आहे. या तिन्ही विभागातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील खानदेश विभागातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भ विभागातील अमरावती, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झालेली आहे आणि या अनुषंगाने या संबंधित 11 जिल्ह्यांना आज हवामान खात्याचा येलो अलर्ट सुद्धा मिळालेला आहे.
हवामान खात्याप्रमाणेच पंजाब रावांनी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 29 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे.
पंजाबरावांनी राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण तीस तारखे नंतर महाराष्ट्रातील हवामान निवळणार असे त्यांचे म्हणणे आहे. पंजाबरावांच्या अंदाजानुसार राज्यात 30 आणि 31 तारखेला पुन्हा एकदा हवामान पूर्वपदावर येईल आणि थंडीची तीव्रता वाढणार आहे.
पण आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर त्यांनी राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गारपीट देखील होऊ शकते असेही म्हटले आहे.