Maharashtra Rain : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. मात्र मान्सून माघारी फिरला असला तरी देखील पावसाचे सत्र मात्र पूर्णपणे थांबलेले नाही. अजूनही राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यातील तज्ञांनी वर्तवला आहे.
आगामी पाच दिवस अर्थातच 23 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज पासून पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही ठिकाणी गारपीट होईल अशा स्वरूपाचा अंदाज सध्या हवामान खात्यातील तज्ञांकडून समोर येत आहे.
कुठे होणार गारपीट?
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या अर्थातच 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जर या सदर जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली तर येथील शेती पिकांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान होण्याची भीती आहे. या भागातील कांदा द्राक्ष डाळिंब समवेतच सर्वच महत्त्वाच्या पिकांना या गारपिटीचा फटका बसणार आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या दहा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट देखील होऊ शकते.
हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मध्य महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.
आज पासून पुढील पाच दिवस म्हणजेच 23 ऑक्टोबर पर्यंत या भागात पावसाची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे आज आणि उद्या या दहा जिल्ह्यांमधील काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाही असा त्यांचा अंदाज आहे.
दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने यंदा दिवाळीच्या काळात देखील महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती पाहायला मिळू शकते असे भाकीत वर्तवले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे आणि आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.