Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या राज्यातील जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीने नुकताच जारी केला आहे. सध्या खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी सुरू आहे. तसेच उन्हाळी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे.
उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कांद्याची रोपवाटिका तयार केली असून रब्बी हंगामातील पिके देखील वाढीच्या अवस्थेत आहेत. दुसरीकडे द्राक्ष डाळिंब तसेच इतर फळबागा देखील इम्पॉर्टंट स्टेजवर आहेत. अशा परिस्थितीत जर पाऊस झाला तर याचा नक्कीच शेती पिकांना फटका बसणार आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर पाऊस पडणार असा अंदाज दिला होता.
पुणे वेधशाळेच्या माध्यमातून हा अंदाज जारी करण्यात आला होता. या भागांमध्ये फार मोठा पाऊस पडणार नव्हता पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली होती. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने उद्याही राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या राज्यातील जवळपास चार जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 19 तारखेला राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातिल दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्हा तसेच जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
उद्या अर्थातच 20 तारखेला कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा परिसर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, वेधशाळेने म्हटले आहे. एवढेच नाही तर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस म्हणजेच आज आणि उद्या ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात वीस तारखेला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पुणे वेधशाळेने वर्तवलेला हा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 21 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार असे म्हटले आहे. 21 ते 26 दरम्यान महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव यांनी यावेळी जाहीर केला आहे.