Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर धुळे आणि नाशिक जिल्ह्यात आज गारपीट होईल असा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ पाहायला मिळत आहे.
ऑक्टोबर हिटचा मोठा प्रकोप पाहायला मिळतोय. ऑक्टोबर हिट मुळे उकाड्यात वाढ झाली आहे. सोबतच राज्यात वादळी पाऊस देखील सुरू आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात काही भागांमध्ये गारपीट होईल असे म्हटले आहे.आज मध्य महाराष्ट्रातील धुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या अनुषंगाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी झाला आहे आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आजही उन्हाचा चटका कायम राहणार असे दिसते.
ऑक्टोबर हिट मुळे आजही राज्यात उकाडा जाणवणार असा अंदाज आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज नाशिक अन नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा, अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज भारतीय हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून या अनुषंगाने या संबंधित सहा जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
सोबतच आज मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.
विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, जालना, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.