Maharashtra Rain : राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही काळ हा प्रवास थबकला होता. पण आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. आज राज्यातील जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरे तर परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. मध्य महाराष्ट्राला देखील परतीच्या पावसाने चांगलाचं दणका दिला आहे. 5 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे आणि 10 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल असे म्हटले जात आहे.
जर मान्सूनच्या परतीच्या प्रवासात काही अडथळे आले तर जास्तीत जास्त 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सून महाराष्ट्रात माघारी फिरणार आहे. दरम्यान राज्यात आजपासून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दक्षिणेकडे जिल्हांमध्ये आणि विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दक्षिण महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात मात्र उन्हाचा चटका कायम राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. तसेच काही भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाची चाल मंदावली होती.
पण, नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु झाला. यामुळे ऑक्टोबर हिटची दाहकता अधिक जाणवत होती. राज्यातील अनेक भागांमधील कमाल तापमान हे वाढले होते. कमाल तापमान चक्क 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते.
पण आता पुन्हा एकदा राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून यामुळे कमाल तापमानात घट आली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरूच राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. आज राज्यातील दक्षिणेकडील आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम टी ने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गसह उत्तर आणि दक्षिण कोकणातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सोबतच सातारा सांगली कोल्हापूर यामध्ये महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ही आज पावसाचा अंदाज आहे.
वाशिम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यातही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विभागात देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबई आणि पुणे बाबत बोलायचं झालं तर या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामानाची शक्यता आहे. खानदेशातील तिन्हीच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे येथे उकाडा जाणवू शकतो.