Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या सुरुवातीचे काही दिवस राज्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे.
जवळपास 5 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या काळात आपली शेतीची कामे करून घेणे अपेक्षित आहे. खरंतर गेली काही दिवस महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आता कालपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, 28 सप्टेंबर पासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून पुढील काही दिवस राज्यातील काही भागात अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात आता जवळपास 5 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपली सुगीची कामे करून घ्यावीत. सोयाबीन, उडीद यांसारख्या खरीप हंगामातील मुख्य पिकांची हार्वेस्टिंग करावी आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कारण की राज्यात 5 ऑक्टोंबर नंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या चार दिवसाच्या काळात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातही राज्यात जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील 23 24 आणि 25 तारखेला राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात पुन्हा एकदा मोठा पाऊस पडेल असा अंदाज असून पाच नोव्हेंबरला यंदा प्रत्यक्षात थंडीला सुरुवात होणार आहे.
आज आणि उद्या राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार
महाराष्ट्रातील बहुतांशी भागात कालपासून हवामान कोरडे झाले आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
आज आणि उद्या म्हणजेच 29 आणि 30 सप्टेंबरला महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विभागात अर्थात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हे दोन दिवस या भागात पावसाचा मुक्काम राहणार असा अंदाज आहे. परंतु या भागातील पाऊस एक ऑक्टोबर पासून कमी होणार आहे.