स्पेशल

पंजाब डख : महाराष्ट्रात आता ‘इतके’ दिवस पाऊस पडणार नाही ! पण ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दडी मारली. जवळपास सात-आठ दिवस पाऊस गायबच होता. यामुळे सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहणार हा मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंजाब रावांनी सप्टेंबर मध्ये पाऊस मैदान गाजवणार असे म्हटले होते.

झालं देखील तसंच सप्टेंबर ची सुरुवात झाली आणि पावसाने गिअर ओढला. अहो, जिथं जुलैमध्येही चांगला पाऊस झाला नव्हता, ऑगस्टमध्ये ही समाधानकारक पाऊस नव्हता त्या भागातही सप्टेंबरच्या दोनच दिवसात पावसाने दाणाफान उडवली.

काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे मराठवाड्याकडून पावसाला सुरुवात झाली. पंजाबरावांनी 31 ऑगस्ट च्या आपल्या अंदाजात मराठवाड्यातील नांदेड, परभणी कडून पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असे म्हटले होते.

यानुसार पावसाने मराठवाड्याकडून सुरुवात केली आणि पाहता-पाहता संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. हा मुलुख अगदीच पायदळी तुडवला. यामुळे मात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले.

अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे चार तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण, पावसाचा जोर आजपासूनच कमी होणार आहे.

आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कमी राहण्याची शक्यता आहे. सात सप्टेंबर पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

या काळात स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप राहील आणि जोरदार पाऊस गायबच राहणार आहे. परंतु तदनंतर म्हणजेच 8-9 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 8-9 सप्टेंबरला जो पाऊस राहील तो पाऊस मोसमी पाऊसचं राहणार आहे. परतीचा पाऊस राहणार नाही.

यानंतर त्यांनी 12-13 सप्टेंबरला पुन्हा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे पंजाब रावांच्या अंदाजावरून यावर्षी परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होणार असे दिसत आहे.

खरेतर, भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार असा अंदाज दिला आहे. आता पंजाब रावांनी देखील तसेच संकेत दिले असल्याने यंदा सप्टेंबरमध्येही आणि ऑक्टोबरमध्येही चांगला पाऊस होईल असे चित्र तयार होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण येत्या काही दिवसात शंभर टक्के क्षमतेने भरणार असा विश्वास पंजाबरावांनी आपल्या मागील अंदाजात व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी एक आकडेवारी जाहीर केली होती या आकडेवारी मध्ये एक जून ते 30 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात जेवढा पाऊस पडतो त्याहून जवळपास 26 टक्के अधिक पाऊस एक जून ते 31 ऑगस्ट या कालावधीतच पडला आहे.

या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 126% पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून यंदा पाऊसमान सरासरीपेक्षा फार अधिक राहणार असल्याचे दिसतय.

तथापि जून महिन्यात पावसाचे असमान वितरण झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद आहे. पण अजून मान्सूनचा एक महिना शिल्लक आहे आणि या कालावधीत त्या भागातही चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो असे बोलले जाऊ लागले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts