Maharashtra Rain : महाराष्ट्रात आगामी काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाने विक्रम मोडला आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मात्र अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
यामुळे उन्हाची दाहकता या उन्हाळ्यात कमीच राहिली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे.
मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र कोकण तसेच विदर्भात ही मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान मान्सूनचे आगमन अंदमान तसेच बंगालच्या उपसागरात झाले आहे. यावर्षी अंदमानमध्ये मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. यामुळे यावर्षी वेळेतच मान्सून केरळ आणि महाराष्ट्रात दाखल होईल असा दावा केला जात आहे.
हे पण वाचा :- अमेरिकन व्यक्तीच भारतीय शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन; तयार केला मायक्रो सोलर पंप, कसा होतोय शेतकऱ्यांचा फायदा? पहा…
मान्सूनच्या आगमनापूर्वी मात्र मान्सून पूर्व पाऊस देखील पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. महाराष्ट्रात देखील मान्सून पूर्व पावसाचे आगमन होणार आहे. या पावसामुळे मात्र खरीपपूर्व तयारीला फटका बसू शकतो. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामाची पूर्वतयारी करत आहेत. त्यामध्ये जमिनीची मशागतीची कामे सध्या सुरू आहेत.
अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने या संबंधित भागातील खरीपपूर्व कामात खोळंबा होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD नुसार मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 22 मे पासून पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच राज्यातील विदर्भमधील काही जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मात्र उष्णतेची लाट कायमच राहणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….
मान्सून केव्हा पोहचणार?
भारतीय हवामान विभागाने यंदा केरळमध्ये मान्सून तीन दिवस उशिरा दाखल होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. सामान्य परिस्थितीमध्ये मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र तीन दिवस उशिराने अर्थातच चार जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे.
तसेच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 9 जून ते 15 जून दरम्यान होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला आहे. यामुळे आता मान्सून नेमका केव्हा महाराष्ट्रात दाखल होतो हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.