Maharashtra Rain Update : भारतीय हवामान खात्याने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी परतला असल्याची मोठी घोषणा केली. राज्यातून नैऋत्य माॅन्सून परत गेला खरा पण अजूनही राज्यात पाऊस सुरूच आहे. साधासुधा पाऊस नाही, जेवढा मान्सून काळात पाऊस झाला नाही तसा पाऊस होत आहे.
पण, या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट आणि ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून किती दिवस पाऊस सुरु राहील ? असा सवाल उपस्थित केला जातोय. तसेच यंदा दिवाळीच्या काळातही पाऊस पडणार का असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून मोठे अपडेट हाती आले आहे.
सध्या ईशान्य माॅन्सून सक्रिय असल्याने आणि अरबी समुद्रातील बाष्प येत असल्याने महाराष्ट्रात पाऊस होत आहे. हवामानाची प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची तसेच २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे.
तसेच २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल मग पुढे ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहचणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सध्या सक्रिय असून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास पाऊस अशी परिस्थिती आहे.
मात्र आता लवकरच पावसाचे सावट दूर होणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे यंदा दिवाळीत पाऊस पडणार नाही. अनेकांच्या माध्यमातून यंदा दिवाळीत पाऊस पडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यावर उत्तर देताना हवामान खात्याने यंदा दिवाळी पाऊस पडणार नसल्याचे जाहीर केले आहे. आगामी काही दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहील मात्र दिवाळीच्या काळात हवामान कोरडे होणार आहे.
म्हणजे यंदा दिवाळीत पाऊस पडणार नाही, त्यामुळे नक्कीच राज्यातील कांदा आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र हा पाऊस रब्बी हंगामातील पिकासाठी फायदेशीर ठरू शकतो असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवले आहे.