Maharashtra Retired Teacher : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळा बंद होतील अशा चर्चांना मोठे उधाण आलं होतं. मात्र विधानसभेत सरकारकडून या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाहीत याची ग्वाही देण्यात आली.
दरम्यान आता एक अतिशय महत्त्वाची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत आता सेवानिवृत्त शिक्षकांना अपॉईंट केल जाणार आहे. आणि अशा शिक्षकांना 20 हजार मानधन देऊ केलं जाणार आहे. खरं पाहता राज्यात 14,965 अशा शाळा आहेत ज्या ठिकाणी 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे.
अशा परिस्थितीत आरटीईच्या नियमानुसार या शाळांवर केवळ आठ हजार शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीला या शाळांवर 29000 शिक्षक कार्यरत आहेत. आणि दुसरीकडे राज्यात अशाही अनेक शाळा आहेत ज्या ठिकाणी आरटीईच्या नियमानुसार शिक्षकांची संख्या कमी आहे.
त्यामुळे आता 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांना नेमले जाणार असून त्यांच्यावर केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात झेडपीच्या 60 हजार 912 शाळा आहेत. यामध्ये 43 लाख 56 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून यासाठी 14,660 शिक्षक विद्यादानाचे काम करत आहेत.
मात्र, राज्यात सत्तावीस हजार अशा शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक नाहीत. यामुळे आता राज्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांना दुसऱ्या शाळेत हलवले जाईल व ज्या ठिकाणी 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. अशा शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांना नेमले जाणार आहे.
या सेवानिवृत्त शिक्षकांना वीस हजार रुपयांचे मानधन देखील दिले जाणार आहे.निश्चितच, यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार असून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद पडणार नाहीत हे यामुळे स्पष्ट होत आहे.