स्पेशल

ब्रेकिंग ! समृद्धी महामार्गाच ठरल; शिर्डी ते मुंबईचा टप्पा ‘या’ महिन्यात खुला होणार, राज्य सरकारने दिल्यात MSRDC ला सूचना

Maharashtra Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर सिद्ध होणार आहे. या महमार्गाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा रंगल्या आहेत. या महामार्गाचा पहिला टप्पा मात्र प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा एकूण 501 किलोमीटरचा असून यामुळे नागपूर ते शिर्डी दरम्यान चा प्रवास सोयीचा झाला आहे.

दरम्यान आता या महामार्गाचा उर्वरित टप्पा देखील लवकरात पूर्ण करण्याचे टारगेट राज्य शासनाने ठेवले आहे. वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता आणि पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता हा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात नुकतीच माहिती दिली आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे एप्रिल 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पहावयास मिळेल. त्यामुळे सरकारचा समृद्धी महामार्ग याआधीच पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या स्थितीला या महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी वाहतुकीसाठी खुला असून उर्वरित म्हणजेच शिर्डी ते मुंबई हा टप्पा या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण केला जाणार आहे.

हा दुसरा टप्पा तयार करताना मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाला वेगवेगळ्या आव्हानांचा देखील सामना करावा लागत आहे. खरं पाहता या दुसऱ्या टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारले जाणार आहेत यामुळे हे काम आव्हानात्मक असून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने सद्यस्थितीला हे काम सुरू आहे. या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा टप्पा राहणार असून याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच नागपूर ते मुंबई थेट समृद्धी महामार्गाने प्रवास करता येणे शक्य बनणार आहे. मुंबईकरांना सध्या स्थितीला नागपूर पर्यंत प्रवास करायचा असेल तर शिर्डी पर्यंत जुन्या महामार्गाने जावे लागत आहे. यामुळे जेव्हा हा संपूर्ण महामार्ग बांधून तयार होईल तेव्हाच मुंबईकरांना संपूर्ण समृद्धी महामार्गाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. सध्या स्थितीला मुंबईकरांना शिर्डी पर्यंत जाण्यासाठी जवळपास साडेतीन ते चार तासांचा कालावधी जुन्या महामार्गाने लागत आहे.

त्यामुळे लवकरच समृद्धी महामार्ग बांधून तयार व्हावा अशी इच्छा प्रवाशांचे देखील आहे. शासनाने देखील पुढच्या वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महामार्ग उभारणीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला जलद कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते सिन्नर हा भाग मार्च अखेरीस खुला केला जाणार आहे. तसेच सिन्नर ते चांदवड हा भाग मे महिन्यात खुला होणार आहे.

याशिवाय, चांदवड ते घोटी (इगतपुरी) हा भाग जूनमध्ये पूर्ण होणार आहे. आणि या महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा आणि अखेरचा टप्पा म्हणजेच घोटी ते आमने (भिवंडी) हा डिसेंबरच्या शेवटी पूर्ण होणार आहे. एकंदरीत डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. निश्चितच हा महामार्ग संपूर्ण वाहतुकीसाठी खुला झाला तर राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर हा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत शक्य होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts