Maharashtra School Timing : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सामान्य जनतेसाठी कायमच वेगवेगळे लोकहिताचे निर्णय घेतले जातात. राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, असंघटित कामगारांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी शासन कायमच वेगवेगळ्या योजना सुरु करते, समाजातील सर्वच घटकांना लाभ देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात.
दरम्यान महाराष्ट्र राज्य शासन लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय राज्यातील आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा राहणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्रातील आश्रम शाळेच्या वेळेमध्ये बदल करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यात जवळपास पाच लाख विद्यार्थी आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.
हे पण वाचा :- शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….
या पाच लाख विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना खरं पाहता शाळेतच वास्तव्य करावे लागते. मात्र या नियमाला शिक्षकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. शाळेतच वास्तव्याचा नियम असतानाही हे आश्रम शाळेतील शिक्षक अपडाऊन करतात.
शाळा सुटल्यानंतर आश्रम शाळेतील शिक्षक घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत हजर होतात. यामुळे सध्या स्थितीला राज्यातील आश्रम शाळा एकाच सत्रात चालवल्या जात आहेत. मात्र आता राज्य शासनाकडून या गोष्टीवर चाप बसवला जाणार आहे.
आता राज्यातील आश्रम शाळा दोन सत्रात भरवल्या जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आश्रम शाळा सकाळ सत्रात सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या सत्रात दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत भरवल्या जाणार आहेत.
हे पण वाचा :- ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….
या नियमामुळे आता आश्रम शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना शाळेतच वास्तव्य करावे लागणार आहे. वास्तविक निवासी आश्रम शाळेत जेवण, पुस्तके, कापड इत्यादीसाठी राज्य शासनाकडून जवळपास 1,500 कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जातात तसेच शिक्षकांच्या वेतनासाठी दरवर्षी एक हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च शासन करते.
एकंदरीत आता या राज्य शासनाच्या निर्णयामुळे आश्रम शाळेवर कार्यरत शिक्षकांना शाळेतच वास्तव्य करावे लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ग्रहण करण्यास मदत होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांचे आता विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष राहणार असून त्यांचा अभ्यास चांगला होणार आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! दहावी, बारावी बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; महाराष्ट्र राज्य बोर्ड करणार तारखेची घोषणा