स्पेशल

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! केव्हा लागणार निकाल? वाचा….

Maharashtra SSC HSC Result : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना चाहूल लागली आहे ती निकालाची.

यावर्षी मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तर पत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल लांबणीवर पडणार असे मत व्यक्त केले जात होते. मात्र आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार दहावी बारावी परीक्षेचे निकाल याही वर्षी वेळेतच लागणार आहेत.

यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून निकालाची चाहूल लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार संभाजीनगर विभागातील दहावी आणि बारावीच्या जवळपास 25 लाख उत्तर पत्रिकांची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…

आता तपासणीनंतर मूल्यांकनातील चुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप निकालाच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

परंतु यावर्षी नियमित वेळेत निकाल जाहीर होणार आहे. सध्या उत्तरपत्रिका तपासणीनंतरची प्रक्रिया विभागीय पातळीवरील कार्यालयात अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मूल्यांकनातील चुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची फेर पडताळणी केली जात आहे.

म्हणून आता येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीचा निकाल सार्वजनिक होणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर विभागात दहावीच्या १५ लाख ८८ हजार आणि बारावीच्या ९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका तपासणींकांनी तपासणी केल्या आहेत.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजनाही लागू होईल अन सेवानिवृत्तीचे वय देखील 65 वर्षे होणार, अभ्यास समिती घेणार निर्णय?

उत्तर पत्रिका तपासणीनंतर संबंधिताकडून उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा करण्यात आल्या आहेत. आणि सध्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी उत्तरपत्रकांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी मंडळ कार्यालयात युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

काही दिवसात ही पडताळणी देखील पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर मग प्रत्यक्ष निकालपत्र तयार करण्यासाठी आवश्यक डाटा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केले जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हाती आली आहे.

एकंदरीत आता दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीचे निकाल विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक केले जाणार आहेत. यामुळे आता निकाल नेमका केव्हा लागतो याकडे विद्यार्थ्यांसहित पालकांचे लक्ष लागून आहे. 

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! पुणे रिंगरोडचे काम ‘या’ महिन्यात होणार सुरु; बाधित जमीनदारांच्या मोबदल्यात पण झाली ‘इतकी’ वाढ? पहा…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts