स्पेशल

मोठी बातमी ! दहावी, बारावी बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; महाराष्ट्र राज्य बोर्ड करणार तारखेची घोषणा

Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यंदा महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.

तसेच बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. अर्थातच आता परीक्षा देऊन दीड महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. यामुळे, विद्यार्थी निकाल केव्हा लागतो याची विचारणा करू लागले आहेत.

पालक देखील आपल्या पाल्यांना दहावी आणि बारावी मध्ये किती मार्क्स मिळतील याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

हे पण वाचा :- ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….

हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून लवकरच दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली जाणार आहे. तसेच काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दहावी आणि बारावीच्या निकालाची अंदाजीत तारीख देखील सांगितली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार यंदा दहावीचा रिझल्ट हा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तसेच बारावीचा निकाल हा 25 मे च्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

परंतु, मंडळाकडून लवकरच याच्या तारखा जाहीर होणार असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे रिझल्ट डिक्लेअर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण ! Mhada च्या 4 हजार 83 घरांच्या लॉटरीची A टू Z माहिती वाचा एका क्लिकवर

कुठं पाहणार निकाल?

अद्याप दहावी आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर झालेले नाहीत. पण ज्यावेळी हे रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हा mahresults.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

निकाल लागल्यानंतर या संकेतस्थळावर दहावी आणि बारावीच्या निकालाची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक म्हणजेच सीट क्रमांक आणि विद्यार्थ्यांचे आईचे नाव टाकावे लागेल. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसणार आहे.

हे पण वाचा :- शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts