स्पेशल

मोठी बातमी ! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख जाहीर ? ‘या’ दिवशी लागणार रिजल्ट, वाचा….

Maharashtra SSC Result : नुकताच महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. या निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यंदा जवळपास 94 टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 89 टक्के आहे. खरं पाहता बारावीचा निकाल हा नेहमीपेक्षा लवकर लागला आहे.

बारावीचा रिझल्ट मे अखेर लागणार असा अंदाज बांधला जात होता मात्र हा रिझल्ट 25 मे लाच लागेल अशी आशा नव्हती. आता बारावीचा रिझल्ट लवकर लागला असल्याने महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा रिझल्ट देखील लवकरच लागणार असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी देखील बारावीचा रिझल्ट लागला असल्याने आता दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांसमवेतच पालक देखील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी; भारतीय वायुदलात ‘या’ पदाच्या 276 जागांसाठी होणार भरती, देशसेवेची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

दरम्यान, दहावीच्या निकाला संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट डिक्लेअर होणार असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकारीक घोषणा करण्यात आलेली नाही.

पण लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा निकाल जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आहे. अशा परिस्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कुठे पाहता येऊ शकतो? या संदर्भात आता आपण जाणून घेऊया.

हे पण वाचा :- मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन दोन दिवस झाली रद्द, वाचा डिटेल्स

कुठं पाहणार निकाल?

अद्याप दहावी बोर्डाचा रिझल्ट लागलेला नाही मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रिझल्ट लागणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या संकेतस्थळापैकी कोणत्याही एका संकेतस्थळाला विद्यार्थ्यांना भेट द्यावी लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी एसएससी रिझल्ट 2023 असा पर्याय दिसेल. यावर क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक म्हणजेच आसन क्रमांक आणि आपल्या आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. ही माहिती इंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे तसेच या निकालाची प्रिंट आउट देखील घेता येणार आहे.

गे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर ! 14 हजार कोटी रुपयाच्या मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर रेल्वे मंत्रालयाला सादर; कसा असणार रूटमॅप, थांबे कुठे? वाचा सविस्तर

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts