स्पेशल

Maharashtra State Employee : ब्रेकिंग ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार मार्चमध्ये वाढ

Maharashtra State Employee : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील नानाविध प्रश्नांवर चर्चा होत आहे. वास्तविक पाहत हे हिवाळी अधिवेशन राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक अस ठरलं आहे.

उपराजधानी नागपूर मध्ये सुरू असलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासनात 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल अशी कर्मचाऱ्यांची आशा होती. मात्र तसं काही झालं नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना ओ पी एस योजना पुन्हा लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. अशातच आता राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले गेले आहे.

विशेष म्हणजे येत्या मार्चपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ देण्यात येईल अशी ग्वाही देखील महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. निश्चितच यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्या कामांचा सन्मान होणार आहे. कोरोना सारख्या विपरीत परिस्थितीतही या कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र या कर्मचाऱ्यांना मिळणार मानधन वाढत्या महागाईचा विचार केला असता खूपच कमी आहे. यामुळे मानधनात वाढ होणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय ज्या अंगणवाड्यांना वीज जोडणी नाही, अशा 60 हजार अंगणवाड्यांना लवकरच वीज जोडणी दिली जाणार आहे.

जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीकडे असलेल्या 10 टक्के सेसमधून अंगणवाडीचे वीज बिल अदा करावे अशा आशयाचे परिपत्रक ग्रामविकास विभागाच्या वतीने काढले जाणार आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत वीजजोडणी न मिळालेल्या अंगणवाड्यांना वीज जोडणी मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts